ladki bahin yojana next installment लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. मात्र, या योजनेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या महिलांना लाभ दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आता आदिती तटकरे यांच्या विधानामुळे ही योजना पुन्हा चर्चेत आली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लाडकी बहीण योजना अधिकृत वेबसाईट
लाडकी बहीण योजनेचा लाभ 2 लाख 30 हजारांहून अधिक महिलांनी घेतला आहे. शेवटच्या दिवशी अर्जांची संख्या पाहिली असता, 2 लाखांहून अधिक अर्ज जमा झाले होते, आणि त्या सर्व महिलांना योजनेचा लाभ मिळणार होता. सहावा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यावर जमा केला जाईल. मात्र, आता 2100 महिलांऐवजी केवळ 1500 महिलांच्या खात्यावर हप्ता जमा होईल, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
Also Read : तुम्हाला पीक वीमा मिळणार का ?
2100 रुपये देण्याची घोषणा जरी झाली असली तरी महिलांना अद्याप थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील बजेटमध्ये 2100 रुपये देण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच हा लाभ महिलांना मिळणार आहे. तोपर्यंत त्यांच्या खात्यावर 1500 रुपये जमा केले जातील. तसेच, ज्यांचे आधीचे हप्ते प्रलंबित आहेत, त्यांनाही लवकरच त्यांची रक्कम मिळेल.
योजनेवर सुरुवातीपासूनच विरोधकांनी टीका केली होती. स्वतः टीका करत असतानाच त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात महिलांना 3000 रुपये देण्याची खोटी घोषणा केली, असा आरोप करत आदिती तटकरे यांनी विरोधकांना सुनावले. त्याचबरोबर, लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा तपासणी होणार नाही, जोपर्यंत त्याबाबत तक्रार येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजनेचे निकष कठोर करणार आणि अर्जांची पुन्हा तपासणी करणार असल्याचे सांगत आहेत, तर दुसरीकडे आदिती तटकरे यांनी वेगळेच विधान केले आहे. त्यामुळे या दोघांच्या परस्परविरोधी विधानांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आता मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, कारण यावर अनेक महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून आहेत.