mahadbt saur kumpan yojana शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता 100% अनुदानावर सौर कुंपण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, पात्रता कोणती, आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे, याची संपूर्ण माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत.
सौर कुंपण योजनेची गरज आणि घोषणा
वन्यप्राण्यांमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने आणि पशुधनावर होणारे हल्ले रोखण्यासाठी शेतकरी सौर कुंपणाची मागणी मोठ्या प्रमाणात करत होते. पूर्वी 75% अनुदान दिले जात होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे 15,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळत होता. मात्र, आता 100% अनुदान मंजूर झाले असून, 20,000 रुपयांपर्यंतचे संपूर्ण अनुदान मिळणार आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
ही योजना श्यामप्रसाद जन वन विकास योजनेअंतर्गत राबवली जाते. मात्र, ही योजना सध्या महाराष्ट्रातील काही निवडक गावांमध्ये उपलब्ध आहे. वन विभागाच्या निकषांनुसार वनालगतच्या गावांमधील शेतकऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे.
अर्ज कसा करावा ?
- महाडीबीटी (MahaDBT) फार्मर पोर्टलवर लॉगिन करा.
- “अर्ज करा” विभागात जा.
- “सौर कुंपण योजना” हा पर्याय निवडा.
- गावांची यादी तपासा – जर तुमच्या गावाचा समावेश असेल, तरच अर्ज सबमिट करता येईल.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज पूर्ण करा.
महत्त्वाची माहिती
- योजनेचा लाभ फक्त वनालगतच्या गावांमधील शेतकऱ्यांना मिळणार आहे.
- गावांची यादी वेळोवेळी शासनाकडून जाहीर केली जाते.
- अधिक माहितीसाठी महाडीबीटी पोर्टल किंवा स्थानिक कृषी/वन विभागाशी संपर्क साधा