bima sakhi yojana पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरयाणामधून ‘विमा सखी’ योजना लॉन्च केली. ही योजना संपूर्ण देशात लागू होणार असून, तिचा उद्देश देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त आणि आत्मनिर्भर बनवणे आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांना ‘विमा सखी’ म्हणवले जाईल. या विमा सखींचे मुख्य काम आपल्या परिसरातील महिलांना विमा पॉलिसी घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यासाठी आवश्यक मदत करणे असेल.
विमा सखी योजना नेमकी काय आहे ?
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ची ही विशेष योजना असून, याद्वारे सहभागी इच्छुक महिलांना तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणामुळे त्यांची वित्तीय समज वाढेल आणि विम्याचे महत्त्व समजावून सांगण्याची योग्य पद्धत शिकता येईल. प्रशिक्षणाच्या कालावधीत महिलांना मानधनही दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, या महिला एलआयसी विमा एजंट म्हणून काम करण्यास पात्र ठरतील. तसेच, बीए उत्तीर्ण महिलांना विकास अधिकारी (डेव्हलपमेंट अधिकारी) बनण्याची संधीही मिळू शकते.
विमा सखी बनण्याची पात्रता काय पाहिजे ?
- विमा सखी योजनेसाठी केवळ महिलाच अर्ज करु शकतात.
- या महिलांकडं दहावी पास असल्याचं प्रमाणपत्रत असं आवश्यक आहे.
- या योजनेसाठी १८ ते ७० वयोगटातील महिला अर्ज करु शकतात.
- तीन वर्षांनंतरच्या प्रशिक्षणानंतर या महिला विमा एजंटच्या स्वरुपात काम करु शकतील.
विमा सखीसाठीचे नियम काय राहणार ?
विमा सखी योजनेंतर्गत तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित महिला एलआयसीच्या विमा एजंट म्हणून काम करू शकेल. मात्र, ती एलआयसीची नियमित कर्मचारी राहणार नाही आणि तिला नियमित कर्मचाऱ्यांना मिळणारे कोणतेही लाभ मिळणार नाहीत. शिवाय, विमा सखी म्हणून निवड झालेल्या महिलांना दरवर्षी आपल्या कामगिरीचा अहवाल सादर करावा लागेल.
विमा सखींना किती रुपये मिळणार?
विमा सखी योजनेअंतर्गत सहभागी महिलांना तीन वर्षांच्या प्रशिक्षण कालावधीत २ लाखांहून अधिक मानधन दिले जाईल. यापैकी पहिल्या वर्षी दरमहा ७ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी ६ हजार रुपये, आणि तिसऱ्या वर्षी ५ हजार रुपये मानधन मिळेल. मात्र, या मानधनात बोनस किंवा कमिशनचा समावेश नसेल. यामध्ये एक महत्त्वाची अट अशी आहे की, महिलांनी विकलेल्या पॉलिसींपैकी ६५ टक्के पॉलिसी पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत सक्रीय असणे आवश्यक आहे.
उदा. एखाद्या महिलेनं वर्षभरात १०० पॉलिसी विकल्या तर त्यांपैकी ६५ पॉलिसी या पुढील वर्षाच्या शेवटापर्यंत अॅक्टिव्ह रहायला हव्यात. याचाच अर्थ असा की महिलांना केवळ पॉलीसी विकायच्याच नाहीत तर त्या चालू राहतील याची देखील काळजी घ्यायची आहे.
विमा सखीसाठी अर्ज कसा करावा ?
- एलआयसीची अधिकृत वेबसाईट किंवा htttps://licindia.in/test2 या लिंकवर क्लिक करुन या योजनेसाठीचा अर्ज भरता येईल. Recruitment of LIC’s BIMA SAKHI (Mahila Career Agents) General Instruction To Candidates
- ही लिंक ओपन झाल्यानंतर सर्वात शेवटी Click here for Bima Sakhi या वर क्लिक करा.
- या ठिकाणी नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पत्ता या डिटेल भरा
- जर तुम्ही एलआयसीचे एजंट, डेव्हलपमेंट ऑफिसर, कर्मचारी किंवा मेडिकल एक्झामिनर यांच्याशी संबंधीत असाल तर त्याची देखील इथं माहिती द्या.
- शेवटी कॅप्चा कोड भरुन सबमिट बटनावर क्लिक करा