खरीप हंगाम 2024 मधील ativrushti nuksan bharpai vatap संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत राज्यातील विविध भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. यासाठी राज्य शासनाने जून-जुलै आणि ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांतील अतिवृष्टीसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांना मंजुरी देऊन निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
अशी करा नुकसान भरपाई KYC
मित्रांनो, एकूण 26 जिल्ह्यांसाठी जवळपास 1600 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मंजूर करण्यात आली असून, यामध्ये परभणी आणि लातूर हे सर्वाधिक नुकसान भरपाई मंजूर झालेल्या जिल्ह्यांमध्ये आहेत. Labharthi yadi आधीच जाहीर करण्यात आलेल्या असून, परभणी जिल्ह्यातील नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ekyc प्रक्रिया पूर्ण केली होती. विधानसभेच्या आचारसंहितेनंतर उर्वरित लाभार्थ्यांची नवीन ativrushti nuksan bharpai yadi जाहीर करण्यात आली होती.
सध्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ativrushti bharpai kyc प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नुकसान भरपाई जमा केली जात आहे. डिसेंबर महिन्यात काही विलंब झाल्यामुळे 11 डिसेंबर 2024 पासून नुकसान भरपाईचा वितरण सुरू करण्यात आले आहे. विशेषतः लातूर जिल्ह्यासाठी 348 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून, लाभार्थ्यांनी ekyc प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
ऑक्टोबर आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठीही प्रस्ताव शासनाला प्राप्त झाले आहेत, परंतु या निधीचे वितरण अद्याप मंजूर झालेले नाही. लवकरच त्या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर उर्वरित जिल्ह्यांमधील pikvima अंतर्गत नुकसान भरपाई वितरित केली जाईल. मित्रांनो, यासंदर्भातील अपडेट्ससाठी Prabhudeva YouTube channel update लक्षात ठेवा आणि अधिकृत माहिती जाणून घ्या.